भंडारा जिल्ह्यातील करडी पालोरा यथे इमारत बांधकामावरून परत येत असलेल्या एका मजुराचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे .दिनेश जिझोटे असे जागीच ठार झालेल्या मजुराचे नाव आहे .हा मजूर 28 वर्षाचा होता.व तो मुंढरी या गावात राहणारा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बांधकामावरून दुचाकीने परत येत असलेल्या मजुरांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिली. यात २८ वर्षीय मजूर जागीच ठार झाला. तर यात गणेश सोनवणे या २५ वर्षीय तरुणाला किरकोळ जखम झाली. ही घटना सायंकाळी मुंढरी पाँईटवर घडली.
या घटनेमध्ये गणेश सोनवणे व दिनेश जिझोटे हे दोघेही मित्र करडी येथे घर बांधकामाच्या कामावर गेले होते. सायंकाळच्या सुमारास काम आटोपून दोघेही दुचाकीने स्वगावी येण्यासाठी निघाले. दरम्यान मुंढरी टी पॉइंटवरून रोहाकडे येत असताना मागुन येणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
यात मागे बसलेला दिनेश जिझोटे हा खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला ,तर गणेश सोनवणे हा बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाला. जखमी सोनवणे याला करडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती करडी पोलिसांना देण्यात आली. व तपास ठाणेदार विलास मुंडे त्यांच्या मार्गदर्शनात यातील पुढील तपास पोलिस करीत आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.