भंडारा: या जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघाच्या मैदानात गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी प्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी समोरासमोर लढणार असल्याची बातमी समोर आली आहे .यात महाविकास आघाडीकडून माजी आमदार चरण वाघमारे तर महायुतीकडून विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे .
राज्यातील 11 विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शरद पवार गट समोरासमोर आले आहेत या तुमसर विधानसभा मतदारसंघातील अजित पवार गटाकडून राजू कारेमोरे हे उमेदवार आहेत तर या मतदारसंघात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे .
दुसरीकडे चरण वाघमारे यांना थेट मुंबईतून तिकीट मिळाले असून शरद पवारांनी ते निश्चित करुण दिले होते.त्यासोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सुद्धा वाघमारे यांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते.
त्यामुळे शरद पवार गटासाठीही ही निवडणूक तेवढीच प्रतिष्ठेची मानली जात आहे. चरण वाघमारे यांनी भारतीय जनता पक्ष सोडून २०१९ मध्ये
अपक्ष निवडणूक लढली होती. त्यात त्यांना ७,७०० मतांनी पराभव पत्करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमोरे विजयी झाले होते.
आता मात्र काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेते वाघमारे यांच्या विरोधात उतरले आहेत. परिणामी त्यांना निवडणूक सोपी नाही, हेही तितकेच खरे आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.