भंडारा: या जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पोहरा- पेंढरी गावात ,फळाच्या दुकानात जाऊन चोरट्यांनी विक्रेत्या महिलेला चाकूचा धाक दाखवित ,सोन्याचे दागिने लुटून नेल्याची बातमी समोर आली आहे.वंदना शंकर दिघोरे (४७) रा. पोहरा असे फळ विक्रेत्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार
रस्त्यावर असलेल्या फळाच्या दुकानात भरदिवसा ही घटना घडली. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वंदना दिघोरे यांचे पोहरा-पेंढरी रस्त्यावर फळ विक्रीचे दुकान आहे, या दुकानात तीन अनोळखी इसम आले, तेव्हा त्यांनी चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले.
या दागिण्यांची किंमत ३२ हजार रुपये सांगण्यात येते आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी होत आहे. याच गर्दीचा फायदा घेत भुरटे चोर मुद्देमाल व अन्य साहित्य लंपास करीत आहे. पोलिसांची गस्त होत असली तरी दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे,
त्यामुळे पीडित महिलेने लाखनी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे, व पुढील तपास लाखनी येथील पोलिस करीत आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.