भंडारा : या जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात दुचाकी अनियंत्रित झाल्याने दुचाकीसह तरुण तलावात कोसळल्याने, त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे .ज्ञानेश्वर खराबे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.हा तरुण 24 वर्षांचा होता. व ज्ञानेश्वर हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता .यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना देवडी येथील टिळक वर्डातील हनुमान तलावात घडली आहे .या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासनाने तलावातून दुचाकी बाहेर काढली .पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गोताखोरांना पाचारण केले. घटनास्थळी तुमसरचे पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर व पोलिसांचे पथक शोध मोहीम राबवत आहेत.
तर सायंकाळी त्याचा मृतदेह पोलिसांना आढळून आला.यात ज्ञानेश्वर हा दुचाकीवरून परसवाडा येथे त्याच्या घरी जात होता .तेव्हा तो तलावात कोसळला .
तलावाजवळ नागरिकांची घरे असल्याने तेथील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली होती .त्यांनी ज्ञानेश्वर चा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.परंतु त्यांना यात यश आले नाही.त्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती दिल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पुढील तपास सुरू केला.
हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास पोलिस करीत आहेत. हनुमान तलाव हा गावाच्या शेजारीच असून, तलावाच्या काठावरून रस्ता आहे. त्यामुळे सुरक्षितता लक्षात घेऊन तलावाल संरक्षक भिंत बांधण्याची गरज आहे. असे अनेकांनी मत व्यक्त केले आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.