भंडारा :या जिल्ह्यातील एका अठरा वर्षीय विद्यार्थिनीने आई-वडिलांमध्ये रोजची भांडणे होतात म्हणून ,आणि कौटुंबिक कलहामुळे त्रास होतो म्हणून कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे.
सुहानी इलापती(18) असे तरुणीचे नाव आहे.ती बी. ए. प्रथम वर्षाचे विद्यार्थिनी होती.
सुहानीच्या कुटुंबात आई-वडील ,एक बहीण ,आणि एक भाऊ आहे ,कौटुंबिक परिस्थिती आणि घरातील रोजची भांडणे, यामुळे तणावात येऊन तिने आत्महत्या केली .
१० वाजताच्या सुमारास ती शेतात गेली आणि दुपारी २ वाजता घरी परत आली .तेव्हा तिला उलट्या झाल्याने तिने कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती पुढे आली. तीची प्रकृती खालवल्याने आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी तिला शासकीय रुग्णालयात नेले .तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला .
या संदर्भात सुहानीचे वडील रवींद्र इलापते (४४) यांच्या तोंडी तक्रारीवरून आणि हॉस्पिटलने दिलेल्या मेमोच्या आधारे लाखनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. उपनिरीक्षक देवीदास बागडे तपास करत आहेत.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.