Bhandara

भंडारा या जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी ही तिनही मतदार संघात उतरली मैदानात

भंडारा : या जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी ही तिनही मतदार संघात मैदानात उतरली आहे. यामुळे जनसामान्यांच्या प्रश्नांची विचारणा केली जात आहे. तर आता पुन्हा राजकीय प्रचाराच्या धुराळ्यात यावर भर असणार आहे. लोकसभेच्या प्रचारा दरम्यान असलेले महागाई, बेरोजगारी, शेतीचे प्रश्न यासह अनेक मुद्दे याही वेळीही कायम राहणार आहेत. त्यावरून महाविकास आघाडी आक्रमक आहे, तर महायुतीची मदार निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेल्या योजनावर दिसत आहे.

मंगळवारपासून तिनही विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू झाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांकडून कॉर्नर सभा तसेच नेत्यांच्या जाहीर सभा व्हायला लागल्या आहेत. १३ दिवस राहणाऱ्या या प्रचारकाळात पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सभाही जिल्ह्यात आयोजित केल्या जात आहेत.

भंडारा विधानसभा मतदार संघात महायुतीचे विद्यमान आमदार नरेंद्र भोंडेकर आणि महाआघाडीकडून काँग्रेसच्या पूजा ठवकर हे उभे आहेत. अशातच उद्धवसेनेचे नरेंद्र पहाडे आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांची काँग्रेसच्या ठवकर यांच्यासमोर बंडखोरी आहे. विधानसभेचे दोनवेळा आमदार राहिल्याने आमदार भोंडेकर यांना प्रशासनाचा भरपूर अभ्यास आहे. मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर निधीआणण्यात त्यांना यश आल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जात आहे.

त्यासोबतच असे असले तरी पवनी तालुक्यात एमआयडीसी व मोठ्या प्रकल्पाची लोकांना प्रतीक्षा आहे.
तुमसर मोहाडी मतदार संघात महायुतीचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना पुन्हा उमेदवारीची संधी देण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीकडून चरण वाघमारे यांना थेट मुंबईतून मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यांना तिसऱ्या आघाडीतील नाराजांचा सामना करावा लागणार आहे. तर यात ठाकचंद मुंगुसमारे अपक्ष उमेदवार म्हणून उतरले आहेत. तर, कारमोरे यांच्या विरोधात धनेंद्र तुरकर अपक्ष म्हणून मैदानात आहेत. माजी आमदार सेवक वाघाये यांनीही जातीय समिकरणाची आखणी करीत प्रहार जनशक्ती पार्टीकडून उमेदवारी मिळविली आहे.

त्यासोबतच साकोली मतदार संघात काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पक्षाने दुसऱ्यांदा विश्वास टाकला आहे. भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर यांच्याशी त्यांचा सामना असणार आहे. या दोघांमध्ये अपक्ष म्हणून लढत देणारे डॉ. सोमदत्त करंजेकर यांची उमेदवारीही लक्षवेधी ठरणार आहे. भाजपमधील नाराजांना घराबाहेर काढून प्रचाराच्या मैदानात उतरविण्यात पक्षाला किती यश येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे . तर या मतदार संघातील प्रचार हळूहळू वेग धरत आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्यांना पाच वर्षाची शिक्षा

यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…

1 hour ago

मोबाईल बंदी असतांनाही मतदान कक्षात मोबाईल

बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या चित्रफिती…

2 hours ago

बाजारात सोयाबीनचे दर वाढेना

वाशिम:- वाशिम मधील बाजारात सोयाबीनचे दर निवडणुकीनंतर वाढतील अशी सर्व शेतकऱ्यांची आशा होती, पण निवडणुकीनंतर…

3 hours ago

दुचाकी घसरल्यामुळे एक जखमी तर एक ठार

अमरावती:- २१ नोव्हेंबर रोजी दुचाकी घसरल्यामुळे १ च्या सुमारास खेडनजीक गावातील अपघातात ६४ वर्षीय इसमाचा…

5 hours ago

सायबर फसवणुकी पासून सावधान

वर्धा:- सायबर फसवणुकीपासून सावधान रहा असे आवाहन जिल्हा पोलीस व सायबर सेल विभागाने केले आहे,…

6 hours ago

मजूर टंचाईमुळे शेतकऱ्यांना धान कापणीच्या कामात अडचणीं

चंद्रपूर (सास्ती) : राजुरा तालुका पांढऱ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे.गेल्या काही आठवड्यांपासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मजूर…

24 hours ago

This website uses cookies.