भंडारा :भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते .आता जिल्ह्यात हलके व भारी लोंबीवर असताना ,शेकडो हेक्टर वर लष्करी अळीचा प्रकोप वाढला आहे .
जिल्हयाचे यंदाचे खरीप पिकाखालील सर्वसाधारण क्षेत्र 1 लाख 71 हजार हेक्टर वर धानाची लागवड झाली आहे.
सप्टेंबर पर्यंत पाऊस आल्याने ,धानाचे पीक चांगले आले आहे .परंतु धान लोंबीवर असताना लष्करी अळीचे आक्रमण वाढले आहे .ही अळी रात्रीच्या सुमारास वेगाने आक्रमण करते .त्यामुळे शेकडो एकर शेती नष्ट होत चालली आहे .याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.त्यामुळे कृषी अधिकाऱ्यांनी शेतावर भेट देऊन,त्यांना मार्गदर्शन केले आहे.
शेतांचे बांध स्वच्छ ठेवावे. किडीची कोषावस्था नष्ट करण्यासाठी भाताची कापणी झाल्यावर खोलवर नांगरणी करून धसकटे जाळून नष्ट करावी. टेहाळणीसाठी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. धानाच्या बांधीत पाणी साठवून ठेवावे. पिकावरून दोर किंवा झाडाच्या फांद्या आडव्या फिरवून लष्करी पाडाव्यात.
बेडकांचे संवर्धन करावे. उद्रेकीय स्थितीमधे अळ्या एका बांधीतून दुसऱ्या बांधीत शिरतात. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त बांधीभोवती कीटकनाशकाच्या भुकटीची रेषा आखावी. यामुळे अळ्ळ्या भुकटीमध्ये माखून मरतात.
आशा उपाय योजना त्यांनी सांगितल्या आहेत.
अमरावती:- पिंपळखुटा येथे बुधवार ला १२ वाजताच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने झोपेत असलेल्या महिला व…
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
This website uses cookies.