Send News on +91 - 92090 51524
More
    HomeChandrapurभद्रावती येथे अवैध दारू विक्रेत्यांनी केला पोलिस पाटलांवर प्राणघातक हल्ला,दारुविक्रेत्यांवर कारवाई करण्याची...

    भद्रावती येथे अवैध दारू विक्रेत्यांनी केला पोलिस पाटलांवर प्राणघातक हल्ला,दारुविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी ..

    Published on

    spot_img

    भद्रावती (चंद्रपूर) : चंद्रपूर येथील भद्रावती तालुक्यातील मासळ या गावात, अवैध दारू विक्रेत्यांनी पोलीस पाटलांवर प्राण घातक हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे .मिळालेल्या माहितीनुसार मासळमध्ये तंटामुक्त समितीने 15 ऑगस्ट 2024 रोजी गावामध्ये दारूबंदीचा ठराव पारित केला होता .तेव्हापासून गावात दारू विक्री बंद आहे.

    परंतु गेल्या चार दिवसांपासून गावांमध्ये दारू विक्री केली जात होती .हनुमान हंसकार व प्रमोद बावने असे दारू विक्री करणाऱ्यांची नावे आहेत. ही माहिती नागरिकांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश महाजन व पोलीसपाटील मारुती मशारकर यांना दिल्यास ,त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्यांना समज दिली.तेव्हा त्यांनी दारू विक्री करणार नाही ,असे सांगितले.

    परंतु दोघांनी गावात देशी दारू आणली ,आणि गावकऱ्यांच्या समोर त्यांच्या दुचाकीची तपासणी केली असता, डिक्कीतून देशी दारूच्या 45 बोटला आढळल्या .तेव्हा पोलीस पाटलांनी दारू पकडल्यास, विक्रेत्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.मासळचे पोलिस पाटील हे आपले कर्तव्य बजावत असताना अवैध दारू विक्रेत्यांनी असा प्राणघातक हल्ला केला.

    त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगार पोलिस पाटील संघाच्या शिष्टमंडळाने ठाणेदारांकडे केली. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश मते, संतोष बागेसर, देऊबा परसे, संतोष बलकी, सपना कातकर, सुषमा रामटेके, सुनिता पाटील उपस्थित होते.

    Latest articles

    विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

    चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के...

    ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

    गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत...

    लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील...

    यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

    यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत...

    Read More Articles