भद्रावती (चंद्रपूर) : चंद्रपूर येथील भद्रावती तालुक्यातील मासळ या गावात, अवैध दारू विक्रेत्यांनी पोलीस पाटलांवर प्राण घातक हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे .मिळालेल्या माहितीनुसार मासळमध्ये तंटामुक्त समितीने 15 ऑगस्ट 2024 रोजी गावामध्ये दारूबंदीचा ठराव पारित केला होता .तेव्हापासून गावात दारू विक्री बंद आहे.
परंतु गेल्या चार दिवसांपासून गावांमध्ये दारू विक्री केली जात होती .हनुमान हंसकार व प्रमोद बावने असे दारू विक्री करणाऱ्यांची नावे आहेत. ही माहिती नागरिकांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अविनाश महाजन व पोलीसपाटील मारुती मशारकर यांना दिल्यास ,त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्यांना समज दिली.तेव्हा त्यांनी दारू विक्री करणार नाही ,असे सांगितले.
परंतु दोघांनी गावात देशी दारू आणली ,आणि गावकऱ्यांच्या समोर त्यांच्या दुचाकीची तपासणी केली असता, डिक्कीतून देशी दारूच्या 45 बोटला आढळल्या .तेव्हा पोलीस पाटलांनी दारू पकडल्यास, विक्रेत्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.मासळचे पोलिस पाटील हे आपले कर्तव्य बजावत असताना अवैध दारू विक्रेत्यांनी असा प्राणघातक हल्ला केला.
त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कामगार पोलिस पाटील संघाच्या शिष्टमंडळाने ठाणेदारांकडे केली. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश मते, संतोष बागेसर, देऊबा परसे, संतोष बलकी, सपना कातकर, सुषमा रामटेके, सुनिता पाटील उपस्थित होते.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.