चंद्रपूर :या जिल्ह्यातील सहा मतदारसंघांपैकी बल्लारपुरातून सुधीर मुनगंटीवार व चिमूर मतदारसंघातून कीर्तिकुमार भांगडिया यांना भाजपने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली होती. तर राजुरा, ब्रह्मपुरी, वरोरा व चंद्रपूर या मतदारसंघांतून भाजप कुणाला उमेदवारी देते?याकडे नागरिकांचे लक्ष लागले होते.
त्यामुळे शनिवारी जाहीर केलेल्या यादीनुसार राजुरा मतदारसंघातून माजी आमदार अॅड. संजय धोटे यांचा पत्ता कापून माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांना उमेदवारी देण्यात आली.
ब्रह्मपुरीत माजी जि. प. उपाध्यक्ष कृष्णा चहारे यांना उमेदवारी जाहीर झाली.तर वरोरा मतदारसंघातून माजी मंत्री स्व. संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे यांना भाजपने मैदानात उतरविले.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीने ब्रह्मपुरी, चिमूर व राजुरा क्षेत्रांतील लढतीचे चेहरे समोर आले आहे. परंतु अजूनही चंद्रपूर मतदार संघात भाजपचा उमेदवार कोण? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.