भंडारा: या जिल्ह्यातील लाखनी या गावात कोंबडीची भाजी न बनवल्या वरून पती-पत्नीत भांडण झाले .यात पत्नीने रागाच्या भरात विळ्याची लोखंडी बाजू पतीच्या डोक्यात मारून पतीला जखमी केले. मुन्ना बाबुराव टेकाम, असे जखमी पतीचे नाव आहे, तर दुर्गा मुन्ना टेकाम असे आरोपी पत्नीचे नाव आहे .
मिळालेल्या माहितीनुसार लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील बरडकिन्ही या गावात ही घटना घडली .यात पतीने पत्नीला भाजी का बनवली नाही ?अशी विचारणा केली असता ,दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले .
यातच पत्नीने स्वयंपाक खोलीत असलेल्या विळ्याच्या मागील बाजूने ,पतीच्या डोक्यावर प्राण घातक हल्ला केला .त्यानंतर पतीने पोलिसात तक्रार नमूद केली ,या प्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.