यवतमाळ :- मतदान प्रक्रिया ही सकाळचे ७ वाजता सुरू होते त्यापूर्वीच उमेदवाराचे दोन प्रतिनिधी ५:३० वाजता मॉक पोल घेतात, मतदानाची प्रक्रिया पारदर्शकरीत्या व्हावी यासाठी मतदानापूर्वी उमेदवारांना व पोलिंग एजंट यांना उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे.व तेव्हा हे उमेदवार मत टाकून ईव्हीएम मशीनची पडताळणी करतात.
प्रत्येकाला एक याप्रमाणे ५० मते टाकून ईव्हीएम मशीन तपासून व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या चेक केल्या जाते, व सर्व बरोबर असल्यानंतर मतदानाची प्रक्रिया सुरू केली जाते.मिळालेल्या माहितीनुसार, ईव्हीएम मशीनवर अनेकांची शंका असते म्हणून या संशयाचे निराकरण करण्यासाठी मतदान बुथवर उमेदवाराच्या समोर माॅक पोल ही प्रक्रिया पार पाडली जाते,
मॉक पोल घेतांना उमेदवाराला उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे अन्यथा उमेदवार उपस्थित नसले तरी मतदान केंद्रातील अध्यक्ष व अधिकारी मॉक पोल घेतात व मतदान करून ईव्हीएम मशीन योग्यरीत्या कार्य करीत आहे की नाही हे तपासत असतात, सर्व बरोबर दिसले तर मशीनला सीलबंद करून सकाळला ७ वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होते.
आपले मतदानाने व्यक्तीने केल्यास
आपले मतदान अन्य कोणत्या व्यक्तीने केलास त्यांना टेंडर बॅलेटच्या पर्याय आहे, मतदान करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने आपले नाव घेऊन मतदान केल्याचे निदर्शनास आल्यास अशा मतदारांना टेंडर बॅलेटचा पर्याय आहे. या बॅलेटद्वारे मतदार आपला हक्क बजाऊ शकतो अशा मतदारांसाठी आयोगाने हा पर्याय उपलब्ध करून दिला.