बुलढाणा :- मतदान काही दिवसानंतर पार पडणार आहे मतदान ही प्रक्रिया गुप्त असून मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाणे कायद्यान्वये गुन्हा आहे, जर कोणताही व्यक्ती मोबाईल घेऊन मतदान करायला गेला तर त्याच्यावर गोपनीयता भंग केल्याची कारवाई करण्यात येईल.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीमध्ये काही युवकांनी मतदान करतांना ईव्हीएम मशीन चे फोटो व व्हिडिओ काढले होते, हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने जास्त प्रमाणात व्हायरल झाले, यामुळे मतदान प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग होत असते.यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना मोबाईल घेऊन प्रवेश दिला जाणार नाही मतदारांची मतदान करण्याआधी तपास केली जाणार,
जर निवडणूक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कार्यवाही करण्यात येईल. असा इशारा पोलिसांनी दिलेला आहे काही युवकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मोबाईल थेट ईव्हीएम मशीन पर्यंत नेऊन व्हिडिओ करून तो व्हिडिओ व्हाट्सअप स्टेटस ठेवला होता, ही प्रक्रिया पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी अनेक व्यक्तीवर गुन्हा दाखल केला, जर कोणीही मतदान केंद्रात मोबाईल घेऊन गेले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
मतदान केंद्रात जाणाऱ्या मतदाराची तपासणी
मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन कोणताही मतदार येणार नाही याची जबाबदारी निवडणूक कर्मचारी व पोलिसांना देण्यात आली आहे, मतदाराची आत येण्यापूर्वी तपासणी करणे, बाहेरच मोबाईल ठेवण्यास सांगणे, मतदारांना महत्त्वपूर्ण सूचना देणे इत्यादी गोष्टी कराव्या लागणार आहेत जर हे काम यशस्वीरित्या पार पडले नाही तर कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल