यवतमाळ:- २० नोव्हेंबरला मतदान केंद्रावर मोबाईल व स्मार्ट वॉच वापरून जाण्यास बंदी आहे, मतदान करताना मोबाईल किंवा स्मार्ट वॉच सारख्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरून आत जाता येणार नाही.मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदार संघामध्ये ११ उमेदवार व एक नोटा असे एकूण १२ क्रमांक राहणार आहे,
मतदान सकाळला ७ वाजता सुरू होऊन संध्याकाळी सहा पर्यंत मतदान बुथ सुरू राहील.जे मतदार रांगेत उभे असणार त्यांचे मतदान करवुन घेतल्या जाईल मतदानाच्या दिवशी उमेदवारांच्या प्रतिनिधींना केंद्रावर हजर राहायचे असल्यास त्यांना ओळखपत्र घेऊन येणे बंधनकारक राहील, मतदानाच्या दिवशी २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
राळेगाव मतदार संघामध्ये मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील बुधवारी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहे, या जिल्ह्यातील केंद्रावर तेलंगणा येथून २०० होमगार्ड, महाराष्ट्र १७० होमगार्ड, १६७ पोलीस बंदोबस्ताकरिता तैनात करण्यात आले. मतदान केंद्रावर सशस्त्र पोलीस तैनात केले जाणार असून ड्रोन कॅमेराचा ही वापर केला जाणार आहे.
मतदान केंद्रावर प्रशासन तयारीत
मतदान केंद्रावर प्रशासन तयारीत असून १०० पोलीस टीम, १७० होमगार्ड, १६७ पोलीस बंदोबस्ताकरिता तयार आहेत, व याच्यामध्ये ड्रोन कॅमेराचा समावेश केला जाणार राळेगाव मतदार संघाचे मतमोजणी २३ नोव्हेंबर ला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणार असल्यामुळे मतमोजणी केंद्र समोरील रस्ता बंद ठेवण्यात येईल.