बुलढाणा :- मतदान देण्यासाठी २० नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सर्व मतदार संघामध्ये येणाऱ्या कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी प्रशासनाने भर पगारी सुट्टी द्यावी अशी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार बुलढाणा मधील सर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना मतदान देण्यासाठी सुट्टी देण्यात यावी, काही कारणास्तव कामगार व कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे शक्य नसेल तर त्यांना मतदान करण्यासाठी किमान दोन तासाची तरी सुट्टी देण्यात यावी असे निर्दश जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी यांनी दिले आहे.
ज्या मालकाने कामगारांना मतदान देण्यासाठी २ तासाची सुट्टी दिली नाही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या इशारा प्रशासनाने दिला आहे, सुट्टी किंवा दोन तासाची सवलत कामगारांना व कर्मचाऱ्यांना न मिळाल्याची तक्रार मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी म.व. जाधव यांनी दिले आहे.
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या चित्रफिती…
This website uses cookies.