Chandrapur

मतदान यंत्रनेचा झाला उदय,मतदान पेटी झाली कालबाह्य

चंद्रपूर : पूर्वीच्या काळात प्रचार करताना ताई, माई, अक्का, विचार करा पक्का ,अन् या चिन्हावर मारा शिक्का,’ असे म्हटले जात होते . तर आता हे वाक्य पूर्णपणे कालबाह्य झाले आहेत. त्या काळात मतदानासाठी मतपत्रिका व त्यावर शिक्का मारून मतदान केले जायचे.

परंतु २००४ च्या निवडणुकीपासून शिक्का कालबाह्य झाला असून, त्याठिकाणी प्रथमच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या माध्यमातून मतदान होत आहे.

मतदान करताना मतदाराच्या हातात मतपत्रिका आणि शिक्का शाईमध्ये बुडवून दिला जात होता . तो शिक्का आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हावर मारायचा. ही पध्दत ग्रामीण भागातील मतदारांसाठी अवघड असायची .विधानसभा निवडणुकीच्या काळात ग्रामीण भागात निवडणुकीला उभे असलेले उमेदवार प्रचारासाठी यायच्या, त्यावर लावलेला भोंगा किंवा माईक घेतलेला व्यक्ती म्हणायचा ‘ताई, माई, अक्का, या चिन्हावर मारा शिक्का.’ मात्र, बदलती निवडणुकीची प्रक्रिया,
इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यंदाच्या निवडणुकीत विविध प्रकारे प्रचार करून उमेदवारांना संभ्रमात सुद्धा टाकले जात आहे.

मतपेटी व शिक्का या काळात बऱ्याच वेळेला अवैध मतांची संख्याही भरपूर असायची. एका मतपत्रिकेवर दोघांना मतदान करणे व इतर काही खुणा करण्याचे प्रकार होत. यामुळे हे मत अवैध ठरायचे. अनेकवेळा तर या अवैध मतांचा आकडा खूप मोठा असायचा. अवैध मतांचा अनेक उमेदवारांना फटकाही बसलेला आहे. परंतु इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या माध्यमातून होणाऱ्या मतदान प्रक्रियेत अवैध मतदानाची संकल्पना संपुष्टात आली होती .

मतदान यंत्रांबदल माहिती :

२०१९ ला आले व्हीव्हीपॅट…

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरि फायबल पेपर ऑडिट ट्रेल) या यंत्राचा वापर करण्यात आला. याच्या मदतीने मतदान केल्यानंतर ७ सेकंदांमध्ये मतदाराला पावती दिसेल. त्या पावतीवर आपण मतदान केलेल्या उमेदवाराचे चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक पाहता येतो.

२०१४ ला आले ‘नोटा’

२०१४ च्या निवडणुकीपासून नोटा है बटन मतदान यंत्रावर दिले. त्यावेळी उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्यास नोटा हे बटन दाबून नकारात्मक मतदान करण्याची सुविधा मतदारांना पहिल्यांदा प्राप्त
करून देण्यात आली आहे.

Vidarbha Trends Team

Recent Posts

रानटी हत्तीच्या कळपाने प्रवेश केला चुरचुरा परिसरात

गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व…

2 hours ago

८ लाखाचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला

यवतमाळ :- गुरुवारला रात्री ८ लाखाचा दारूसाठा जप्त करून आरोपीवर कारवाई करण्यात आली, विधानसभा निवडणुकीच्या…

2 hours ago

पट्टेदार वाघीण फिरत असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

पालांदूर: भंडारा जिल्ह्यात पट्टीदार वाघीण जंगलाच्या परिसरात फिरत असते . वनविभागाला ही वाघीण परिचित आहे.…

3 hours ago

१८ वर्षाखाली पत्नी सोबत संबंध ठेवणे बलात्कारच

अकोला:- वर्धेत एका प्रकरणात १८ वर्षाखाली पत्नी सोबत शरीर संबंध ठेवणे हे बलात्कार ठरते, असे…

3 hours ago

फसवणूक करणाऱ्या लिंकपासून सावध राहा

वाशिम :- मागील अनेक दिवसांपासून फसवणूक करणाऱ्या लिंक फॉरवर्ड होत आहे, ज्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात…

4 hours ago

बेकायदेशीर गर्भलिंग कळवणाऱ्या व्यक्तीस १ लाखाचे बक्षीस

वर्धा :- प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करून बेकायदेशीर गर्भपात करणे कायद्याने गुन्हा आहे. तिरिही मुलाच्या हव्यासापोटी…

5 hours ago

This website uses cookies.