बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, विनयभंग करून मुलीला व तिच्या आईस मारहाण केली. याप्रकरणी न्यायालयाने २२ नोव्हेंबरला तीन आरोपींना दोषी ठरवून निर्णय देण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलीची आई ही अंगणात झाडू मारत होती धूळ उडत असल्याने आरोपी सतीश हिवाळे यांनी अल्पवयीन मुलीच्या आईसोबत वाद घातला. सतीश हिवाळे याची पत्नी सुनीता हिवाळे व नवीन हिवाळे यांनी मिळून पिडीताच्या आईला काठी चापट व बुक्क्यांनी मारहाण केली,
व अश्लील शिवीगाळ करून जीवाने मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलगी घरी असतांना आरोपीने विनयभंग करून पळुन गेला, याप्रकरणी अल्पवयीन पीडीतेने दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार पोक्सो ऍक्ट द्वारे आरोपीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तीन्ही आरोपींना अटक करून चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
मारहाण कोणत्या कारणावरून
अल्पवयीन पीडीतेची आई अंगणात झाडू मारत असतांना धुड उडाल्यामुळे सतिश हिवाळे, सुनीता हिवाळे, नविन हिवाळे पीडितेच्या आईला चापट बुक्क्यांनी मारहाण केली व अश्लील शिवा देऊन जीवे मारण्याची धमकी दिली.