बुलढाणा:- मालवाहू वाहनाने वाहतूक पोलिसांच्या कारला खामगाव – बुलढाणा मार्गावरील नांद्री फाट्याजवळ १६ नोव्हेंबर रोजी धडक मारली.मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा शहरांमधून वाहतूक पोलीस हे वाहनाने खामगावकडे जात असतांना एक समोरून मालवाहू वाहन भर वेगात आले व पोलिसांच्या वाहनाला जबर धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये चारही पोलीस गंभीर जखमी होऊन यात पोलिसांच्या वाहनाचा चुराडा झाला, या अपघातामध्ये हनुमान महाले, सुनील दांडगे, सागर शेळके व वाहन चालक खुमकर हे चार पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.या घटनेची माहिती खामगाव पोलिसांना मिळताच त्यांनी जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना त्वरित उपचारासाठी नेले, खामगाव रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे स्थानांतरित करण्यात आले.
मालवाहू वाहनाची धडक
वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला मालवाहू वाहनाने भरधाव धडक खामगाव – बुलढाणा मार्गावरील नांद्री फाट्याजवळ दिली. बुलढाणा कडून पोलीस कर्मचाऱ्यांचे वाहन (एमएच २८ बीके ४८९७) खामगावकडे जात होते, समोरून मालवाहू वाहन (एमएच २१ बीएच ७६४८) वाहनाने पोलिसांच्या वाहनाला जबर धडक दिली.