बल्लारपूर :मागील काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातीलबल्लारपूर रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहे . यामुळे प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होते. दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी सोमवारी (दि.११) मोबाईल चोरांचा छडा लावला असून, आरोपींकडून १ लाख ३८ हजार किमतीचे १० मोबाईल जप्त केले आहे .
आरोपींमध्ये शुभम उर्फ गोलू प्रशांत दासरवार (वय १९, साईबाबा वॉर्ड), साहिल गजानन देशमुख (१९, शिवाजी वॉर्ड) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी तिघांना अटक करून मंगळवारी वर्धा रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले आहे .
मिळालेल्या माहितीनुसार बल्लारशाह रेल्वेस्थानकावरील दक्षिण भागातील आऊटरवर थांबून दरवाजावर बसलेल्या प्रवाशाचा मोबाईल पाडून काही युवक लुटत होते. ही माहिती लोहमार्ग पोलिसांना माहिती मिळाली होती . दरम्यान, सोमवारी लोहमार्ग पोलिसांनी अनेक संशयित आरोपींना रेल्वे ठाण्यात बोलावून विचारपूस केली. तसेच त्यांच्याजवळ असलेले मोबाईल ट्रेस केले असता यातुन त्यांनी मोबाईल चोरल्याचे निष्पन्न झाले. यावरून दोन गुन्ह्यांत तीन आरोपींना अटक करून वर्धा रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले.
या घटनेसंदर्भातील गुन्हेगारांवर भारतीय न्याय संहिता ३०४ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल दुर्गाप्रसाद वर्मा, करण सूर्यवंशी (वय १९) यांच्यावरही मुंबई कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक हर्षल चापले, पोलीस हवालदार संतोष वडगिरे, अन्सार खान, संदेश लोणारे, पंकज भांगे, निलेश निकोडे, अजय मून, काशिनाथ केन्हे यांनी केली.
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
बुलढाणा:- विधानसभा निवडणुकीत मोबाईल बंदी असतानाही नागरिकांनी मतदान कक्षात मोबाईल नेऊन व्हीव्हीपॅट वोटिंग मशीनच्या चित्रफिती…
This website uses cookies.