यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी एकूण १३ टीम तयार केल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, या मतदान प्रक्रियेत ८५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांनी दिव्यांग मतदाराचा समावेश असणार आहे,
मतदारांना मत करण्यासाठी सोपे व सुलभ होण्यासाठी निवडणूक विभागाने घरी जाऊन या व्यक्तींचे मतदान घेण्यासाठी एकूण १३ टीम तयार केल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील ७ विधानसभा क्षेत्रामध्ये ८५ वर्षावरील वृद्ध व्यक्ती ७ हजार ७४३ मतदार आहेत. यापैकी १२६६ मतदारांनी घरूनच मतदान करायचे ठरवले आहे,
या प्रक्रियेमुळे वृद्ध व्यक्तीच्या मतदानामुळे मतांची टक्केवारी वाढण्यात मदत होईल. या १३ टीम मध्ये टीम प्रमुख, व्हिडिओग्राफर, सूक्ष्म निरीक्षक, गार्ड इत्यादी राहणार आहेत. ८५ वर्षावरील अर्ज केलेल्या अर्जापैकी दोन वृद्धांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी ही माहिती निवडणूक विभागाकडे पाठवली आहे.
यवतमाळ मध्ये मतदानासाठी १३ टीम सक्रिय राहणार
अर्ज केलेल्या मतदारांपैकी १२६६ मतदाराकडे निवडणूक विभागाची टीम मतदान घेण्यासाठी पोहचणार आहे, यामध्ये गार्ड, सूक्ष्म निरीक्षक, व्हिडिओग्राफर, टीम प्रमुख राहणार आहेत. ही यंत्रणा तिन्ही दिवस १४,१५,१६ या तिन्ही दिवशी मतदारांच्या घरी जाऊन त्या व्यक्तीचे मतदान घेनार, व त्या मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करून मतमोजणीच्या वेळेस मत मोजले जाणार आहे.