यवतमाळ :- यवतमाळ मधील आर्वी तालुक्यातील कृष्णा नगर, माळेगाव व सावळी सदोबा गावांमध्ये वीज वितरण कंपनीच्या पथकाने छापा मारून विज चोरी करणाऱ्या ४० जणांना पकडले.मिळालेला माहितीनुसार ,या गावातील लोक वीज चोरी करून आपली गरज भागवीत होते. पण याचा तोटा महावितरण कंपनीला होत होता, विज चोरी होण्याची माहिती मिळताच विज कंपनीने या गावांमध्ये धडक मारून ४० जणांना पकडले.
या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.महावितरण कंपनी या वीज चोरी करणाऱ्या नागरिकांकडून दंड भरून घेणार आहे जर नागरिकांनी दंड भरला नाही तर त्यांच्यावर विद्युत कायदा २००३ अंतर्गत कलम १३४ द्वारे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती विभागीय अधिकाऱ्यांनी दिली आहे .
वीज चोरी करणाऱ्या ४० व्यक्तींची ओळख माहीत झाली असून विज चोरीमुळे महावितरण कंपनीला आर्थिक तोटा होत असल्याने विज चोरी थांबण्यासाठी कंपनीकडून उपाययोजना व जनजागृती करण्यात आली नागरिकांनी चोरी टाळून अभय योजनेचे लाभ घ्यावा असे महावितरण वीज कंपनीचे उपकार्यकारी म्हणतात.