यवतमाळ:- यवतमाळ मधील चांदोरे नगर परिषदेच्या हद्दीतील पाईपलाईन लिकेज झाल्याने सर्वसामान्य लोकांना खराब पाणी मिळते. यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे यवतमाळ मधील जीवन प्राधिकरणाची पिण्याच्या पाण्याच्या लाईन चांदोरे नगरातून गेली,
व ६ महिन्यापासून ही पाईपलाईन लिकेज झाल्याची माहिती वारंवार नागरिक देत असतात. मात्र जीवन प्राधिकरणाने या पाईपलाईन वर मुरूम टाकला त्यामुळे दूषित पाणी थेट सर्वसामान्य नागरिकांच्या घरी जाते. याकडे प्रशासनाची दुर्लक्ष आहे त्याचे आरोग्य बिघडत आहे नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.