यवतमाळ: आज २८ सप्टेंबर रोजी शनिवारला उमरखेड ईद-ए-मिलाची मोठी रॅली काढली जाणार आहे .यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे .शनिवारला सकाळी ८:३० वाजता जिल्हा पोलीस दलाचे जलद क्रिया दलाचे पथक यवतमाळ वरून स्कार्पिओने उमरखेडला जात असतांना हिवरा संगम जवळ वाहनांचा अपघात झाला. यात पोलीस उपनिरीक्षकासह सात कर्मचारी जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी जलद गतीने मदत पोहोचवली. या सर्व जखमी झालेल्यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पोलीस मुख्यालयातील वाहन उमरखेड कडे जातांना अचानक वाहन अनियंत्रित झाले, व हिवरा संगम गावाजवळ अपघात झाला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संजय धावणे(५६), अतुल नागमोते (३०), राहुल एकनाथ (२७), अंकित मनावर (२६),आकाश जाधव (२३), आकाश काळे (३४) यांच्यासह सात जण जखमी झाले. ही पोलिसांच्या वाहनाची अपघात झाल्याची दुसरी घटना आहे याआधी व्हीआयपी वाहण्याच्या पायलेटिंग करणाऱ्या पोलीस वाहनाचा टायर फुटल्याने अपघात झालेला होता.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.