यवतमाळ :- रविवारला सकाळच्या ४ च्या दरम्यान यवतमाळ मधील पांढरकवडा तालुक्यातील रुंझा येथे अवैधरित्या दारू आणत असल्याची माहिती मिळाली, यावरून पोलिसांनी प्लॅन रचून दारूचे वाहतूक करणारे व वाहनाची पायलटिंग करणाऱ्या दोन वाहनांना जप्त केले. व ९७ हजार ६७४ रुपये किमतीची दारू साठा व दोन्ही वाहने मिळुन असा एकूण १४ लाख ५२ हजार ६७४ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली त्यांनी प्लॅन रचुन दोन गाड्या रस्त्यात अडवल्या स्विफ्ट नावाच्या कारमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या २९ दारूच्या पेट्या आढळून आल्या. त्या पेट्यांमध्ये एकूण ९७ हजार ६७४ रुपयाची दारू होती, पोलिसांनी दोन्ही कार स्विफ्ट व बलेनो दारूच्या पेट्यासह जप्त केली.
स्विफ्ट व बलेनो कारचे चालक निलेश दासवटकर संदीप जयस्वाल यांना अटक केली व त्यांना विचारण्यात आले की ही दारू कोणाला देणार आहे, त्यांनी तिसरा आरोपी अकोला बाजारातील विष्णुपंत जयसिंगपूरे याची असल्याची कबुली केली. म्हणून पोलिसांनी तीन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कार्यवाही पोलीस एसडीपीओ निरीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली झाली.