यवतमाळ:- मजरा येथे युवकाने ९ ऑक्टोंबर रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली, ही घटना ९ ऑक्टोंबर रोजी घडली मृताचे नाव रुपेश शामसुंदर आत्राम असे आहे.रुपेश आत्राम हा मारेगाव तालुक्यातील कुंभा या गावचा आहे वडिलांचे निधन झाल्यामुळे तो मागच्या दोन वर्षापासून मामाकडे राहत होता.
रुपेशचे लग्न झाले होते कौटुंबिक कारणामुळे त्याचा घटस्फोट झाला, त्यामुळे तो स्वतःमध्ये गुंग असायचा. अशा अवस्थेतच तो मजरा मधील चौकामध्ये दुपारच्या सुमारास विष प्राशन केले , ही गोष्ट नागरिकांना कळताच त्यांनी नातेवाईकांना माहिती दिली. व रुपेशला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले व तेथून वणीला रेफर केल्याने उपचारादरम्यान वणीला मृत्यू झाला.