यवतमाळ:- मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातल्या वनी – यवतमाळ रस्त्यावर अनेक झुडपे तयार झाली असून या झुडपामुळे अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.खेळोपाडी वाहने जास्त झाल्याने त्यांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागतो, मात्र या रस्त्यावर जवळपास खड्डे मोठ्या प्रमाणात आढळून आले. या खड्ड्यामधून वाहन चालवताना झुडपांच्या फांद्या लागतात, या सर्व गोष्टीमुळे वाहन धारकांचा अपघात होऊ शकतो कारण झुडपामुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही.
आधी संबंधित प्रशासन अशा रस्त्यावर फलक लावायचे पण आता असे फलक लावत नसल्याने अपघात होण्याच्या घटना जास्त वाढल्या आहेत. यावर विभागाचे डोळे कसे उघडतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.