यवतमाळ :- यवतमाळ मधील महागाव तालुक्यात घोणसरा येथे रविवारला गांजाची शेती केल्याची बातमी पुसद पोलिसांना मिळाली, त्यांनी गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करून ७६ हजाराच्या मुद्देमाल जप्त केला.मिळालेल्या माहितीनुसार, पुसद पोलिसांना बनसिंग राठोड (३३) यांनी आपल्या शेतीत कपाशीच्या पिकामध्ये गांजाची झाडे लावली ही गुप्त माहिती मिळाली
त्या आधारावर पोलीस पथकांनी तपास सुरू केली व रविवारला शेतामध्ये धाड टाकली. यामध्ये पोलीस निरीक्षक राऊत व इतर अधिकारी यांनी शेतात तपासणी केली असता ५० गांजाची झाडे आढळून आली. या पथकांनी शेतातून ३६ किलो वजनाचा गांजा जप्त केला व बनसिंग राठोड याला अटक केली,
आरोपी बनसिंग वर पोलिसांनी अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व या प्रकरणाची पुढील तपास सुरू आहे.हा शेतात उत्पादित केलेला गांजा विक्रीसाठी कोणाला पुरवला जातो याचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, या कारवाईतून एक मोठा सुगावा पोलिसांच्या हाती लागलेला आहे त्यामुळे अमलीजन्य पदार्थावरील नियंत्रण आणता येईल.