गडचिरोली : या जिल्ह्यात हत्तींचा कळप पाल नदी ओलांडून देलोडाच्या जंगलात दाखल झाला आहे.देलोडा व चुरचुरा अशा दोनच गावाच्या जंगल परिसरात हत्तींची सध्या ये-जा सुरू आहे. त्यामुळे शेतीची कामे करण्याबबात या भागातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
सध्या गेल्या काही दिवसांपासून रानटी हत्तींचा कळप पोर्ला वन परिक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्रात वावरत होता.
तर रानटी हत्तींचा कळप आठ दिवसांपूर्वी सिर्सी उपक्षेत्रात दाखल झालेला होता; हा कळप आरमोरी तालुक्याची हद्द ओलांडून कुरखेडा तालुक्यात प्रवेश करेल असे अंदाज लावल्या जात होते ,परंतु पुन्हा हा कळप चुरचुराच्या जंगलात वापस आला . गेल्या चार ते पाच दिवसांपासून कळपाचा वावर चुरचुराच्या जंगलात होता. परंतु शुक्रवारी हा कळप देलोडाच्या जंगलात गेला.
या कळपात नवीन एका सदस्याचे आगमन झाले असुन तो अधिक भ्रमंती करीत नाही. परंतु पोर्ला वनपरिक्षेत्रात जवळपास महिनाभरापासून हत्तींचा वावर आहे. देलोडाचे वनरक्षक भोयर हे नागरिकांना हत्तीच्या लोकेशनची माहिती वेळोवेळी देत आहेत. त्यामुळे नागरिक सतर्कता बाळगत आहेत.
रानटी हत्तींचा कळप महिनाभरापासून चुरचुरा उपक्षेत्रात होता. दरम्यान हत्तीच्या लोकेशनची माहिती चुरचुरा उपक्षेत्राचे क्षेत्रसहायक व वनरक्षकांनी नागरिकांना देणे आवश्यक होते; परंतु जागृती न झाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे हत्तींनी अतोनात नुकसान केले. क्षेत्रसहायक व वनरक्षकांच्या दुर्लक्षामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई मिळालेली नाही. ही भरपाई केव्हा मिळणार, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे .
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.