अमरावती:- रेशनच्या ई – केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड लाभार्थ्यांची ई – केवायसी करणे बंधनकारक आहे. या आधी रेशन कार्डधारकांना ई- केवायसी करण्याकरिता ३१ ऑक्टोंबर होती. आता या तारखेमध्ये बदल करून केंद्रशासनाने ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे,
या दिलेल्या अवधीमध्ये लाभार्थ्यांना ई – केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार अन्यथा रेशन पुरवठा बंद होण्याची शक्यता आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यामध्ये सर्व रेशनकार्ड धारकांना ई – केवायसी करणे महत्त्वाचे असल्यामुळे ६०% लाभधारकांनी ई – केवायसी केली तर ४०% रेशन कार्डधारकांनी ई – केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही. म्हणून केंद्रशासनाने दिलेली मुदत वाढवून ३१ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ दिली आहे, जर या लाभधारकांनी ई – केवायसी केली नाही तर यांना राशनचा लाभ मिळणार नाही.
रेशनच्या दुकानात ई -केवायसी सुविधा
रेशनच्या दुकानात ई – केवायसी करण्यासाठी ई – पास मशीनद्वारे संबंधित लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकल्यावर बोटांचे ठसे किंवा डोळे स्कॅन करून ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल, म्हणून ज्या रेशन कार्ड लाभार्थ्यांची ई – केवायसी बाकी आहे त्यांच्यासाठी केंद्रसरकारने ३१ डिसेंबर पर्यंत मुदत वाढ दिली आहे.