यवतमाळ :- मुंबईतील ओएनजीसी कंपनी मधल्या युवकाने जीवनसाथी ॲपवरून स्वतःच्या समाजातील सुशिक्षित मुलगी शोधली व ओळखी करून काही दिवस बोलू लागला, मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले व दोघांनी आपापल्या प्रेमाबद्दल कुटुंबीयांना सांगितले कुटुंबीयांच्या संमतीने दोघांचे लग्न ठरले.
युवकाने तरुणीला प्रीवेडिंग शूटिंग साठी गोवा येथे बोलावून तिच्यावर अत्याचार केला.त्यानंतर दिवाळीनिमित्त यवतमाळला येऊन तरुणीवर अत्याचार केला यानंतर मुलीला म्हणू लागला तुमचे कुटुंब गरीब आहे मी लग्न करणार नाही असे म्हणून तरुणीची फसवणूक केली. या प्रकरणी युवतीने त्वरित अवधूतवाडी पोलीस स्टेशन गाठून आरोपी युवकांवर गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युवकाचे नाव अभिषेक कोडमेथे हा वाघापूर येथे राहायचा त्याने जीवनसाथी डॉट कॉम ॲपवरून सुशिक्षित स्वतःच्या समाजातल्या मुलीशी ओळख केली, व काही दिवस दोघांचे चांगले संभाषण होऊ लागले. त्यांची मैत्री होऊन मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले अभिषेक हा मुंबईत राहत होता. कधी कधी प्रेयसीला भेटण्याकरिता यवतमाळ मध्ये यायचा.
२६ जूनला या दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधाची माहिती कुटुंबीयांना दिली.दोघांच्या कुटुंबाने प्रेम संबंधाला मान्यता देऊन लग्न लावून देण्याचे ठरविले दोघांचे लग्न जुडल्यानंतर युवकाने २० सप्टेंबर रोजी तरुणीला प्रीवेडिंग शूट साठी गोवा येथे बोलाविले प्रीवेडिंग शूट झाल्यानंतर युवकाने हॉटेलमध्ये युवतीवर अत्याचार केला.
लग्न ठरले होते म्हणून युवतीने नकार दिला नाही दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये युवक यवतमाळला आला होता, तेव्हा पण पिडीत तरुणीवर युवकांनी अत्याचार केला. नंतर युवकाने तुमचे कुटुंब गरिब आहे म्हणून लग्नास नकार दिला तरी अवधूतवाडी पोलीस स्टेशन गाठून युवकाविरोधात तक्रार दाखल केली.याप्रकरणी पोलिसांनी युवकावर भारतीय न्यायसंहितेप्रमाणे कलम ३५१,६९ प्रमाणे गुन्हा दाखल केला व पीडीतेला न्याय मिळेल असे प्रयत्न केले जात आहे.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.