गोंदिया : जिल्ह्यातील वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
एकीकडे निसर्गाच्या संकटांचा सामना करत असतांना शेतकऱ्यांची दमछाक होते .तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्यामुळे वनविभागाने यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांची शेती जंगल परिसराला लागून आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा शिवारात नेहमीच वावर असतो. परतीच्या पावसानंतर कापणीला आलेल्या धानाची प्रामुख्याने रानडुकरांनी मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे. यावेळी बहुतांश शेतकऱ्यांनी जड धान पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे धान कापणीला थोडा वेळ आहे. सध्या हे पीक शेतात उभे असतानाच पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे . तर पावसाने आता उसंत दिली आहे . शेतकरी कापणी करीत असताना रानडुकरांकडून पिकांची नासाडी होत आहे. रानडुक्करांनी
खरीप हंगामातील तूर आणि इतर पिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे वन विभागाकडून पंचनामे केले जात आहेत. काही शिवारात पंचनाम्याची कामेही सुरू आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर एक अहवाल तयार करण्यात येईल. आणि त्यानंतर तो शासनाकडे पाठविण्यात येणार येईल . त्यामुळे नुकसानभरपाई मिळविण्यासाठी बराच कालावधी लागण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त करीत आहे.
दरवर्षी वनविभागाकडे वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे अहवाल नोंदवलेले असतात . मात्र, त्याची भरपाई वर्षानुवर्षे रेंगाळत ठेवली जाते. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते . त्यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी किंवा शेतकऱ्यांना तशी परवानगी तरी द्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
वन्यप्राण्यांच्या संचारामुळे नुकसान :
जंगल परिसरात वन्यप्राण्यांचा नेहमीच मोठ्या प्रमाणात संचार असतो. वन्यप्राण्यांनी शेतकरी तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांवर अनेकदा प्राणघातक हल्ले केले. अनेकांचा यात मृत्यूदेखील झाला. मात्र, अद्याप शासनाने प्रभावी अंमलब जावणी केलेली नाही. देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, तिरोडा तालुक्यांत धानशेती प्रामुख्याने जंगल भागाला लागूनच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊनच शेतीची कामे करावी लागत आहेत.