वर्धा:- पोलीस ठाण्यातील मास्टर कॉलनी मध्ये एका मुलाला विजेचा झटका लागून मृत्यू झाला. तर दुसरी घटना गिरड पोलीस हद्दीतील उमरी शिवारामध्ये घडली ,या दोन्ही घटनांची नोंद ६ ऑक्टोबरला घेण्यात आली. रितेश पवन उमरे (२०)याला विजेचा झटका लागला त्याला तातडीने सावंगी रुग्णालयात नेण्यात आले,
मात्र उपचारादरम्यानच त्याच्या मृत्यू झाला. तर दुसरी घटना उमरी गावात झाली ओम सपाट (१५) हा सकाळला घरून निघाला व रात्री खूप वेळपर्यंत आला नाही त्याच्या शोध घेतला असता, तो एका शेतामध्ये पडून दिसला त्याच्या चेहरा ,हात ,पाय पूर्ण काळे पडले होते. त्याला करंट लागून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली.