वर्धा:- ७ ऑक्टोंबर रोजी अल्पवयीन मुलाच्या हस्ते १० लाख ८ हजार रुपयाचे दागिने चोरून नेणाऱ्या बापलेकाविरुद्ध वर्धा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दिनेश राजपुरोहित व सुखदेवसिंग राजपुरोहित हे आरोपींची नावे आहेत,
यामिनी निंबाळकर रहिवासी आनंदनगर यांना त्यांच्या पतीने दागिने दिवानात आहेत किंवा नाही ते बघितल्यास सांगितले. यामिनीने दिवानात बघितले असता त्यांना सोन्याची एकही वस्तू दिसली नाही .त्यात सोन्याच्या गोफ, चैन, अंगठ्या, राणीहार, मंगळसूत्र ,ब्रासलेट अशा प्रकारचे १२ सोन्याचे दागिने होते .ते दागिने दिसले नाही तिने पतीला सांगितले दोघांनीही मुलाला विचारले मुलाने सांगितले की ४ ऑक्टोबरला दिनेश व सुखदेव यांनी घरचे दागिने घेऊन हॉटेल मध्ये बोलवले .
त्यांनी १ लाख रुपये ऑनलाईन व ५ हजार रुपये रक्कम दिले ,शहर पोलिसात दोघांबापलेका विरुद्ध गुन्हा दाखल केला, अल्पवयीन मुलाच्या हस्ते चोरी केली म्हणून पोलिसांनी दोघांनाही अटक केली.