वर्धा:- वर्धेमधील महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली, हा प्रकार ९ ऑक्टोंबर रोजी सामोर आला व याची पोलिसात तक्रार करण्यात आली.केळकर वाडी परिसराततील घराचे काम सुरू होते बांधकामाच्या बाजूला एक लेआउट आहे त्यामध्ये महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली,
तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र साळुंखे यांना दिसला.त्यांनी त्या गोष्टीची दखल घेत तात्काळ पोलिसांना सुचित केले, पोलिसांना माहिती मिळताच तिचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला.
व मृतदेह तपासण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला, पोलिसांनी हा मृत्यू आकस्मिक झाल्याची नोंद केली. पण आत्महत्येचे कारण कळू शकले नाही या आत्महत्येची पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.