वर्धा:- गुरुवारला किराणा व्यापाऱ्याने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली शुक्रवारला नदीपात्राजवळ त्यांचा मृतदेह आढळला. संजय दीपचंद मोटवानी (५४) असे मृताचे नाव आहे.शुक्रवारला सकाळी ८:०० वाजता पोलिसांना नदीपात्राजवळ मृतदेह दिसला,
त्यांनी गुरुवारच्या रात्री नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली लोकांचे या गोष्टीकडे लक्ष जाताच त्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी नदीपात्रामध्ये शोध सुरू केला सकाळला स्नेहल नर्सरी जवळच्या नदीपात्रातून मृतदेह सापडला.
या मृतदेहाची ग्रामीण रुग्णालयामध्ये तपासणी करून कुटुंबियांना मृतदेह सोपविण्यात आला. त्यांना आत्महत्येचे कारण सापडले नाही पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली व तपास सुरू केला.