वर्धा:- ही घटना सेलू तालुक्यातील सुरगाव मध्ये घडली , सात वर्षापासून ग्रामपंचायत मध्ये राजकुमार भगत शिपाई पदावर कार्यरत होता. गावामध्ये कोणते प्रकारचे आदेश न देता रोजगार सेवकाला कायमस्वरूपी नियुक्त करण्यात आले.राजकुमार भगत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन केले की,
नियमानुसार पदावर नियुक्त करावे नाहीतर मी माझ्या कुटुंबाचा उपोषण करेल. सुरगाव मध्ये २०१७ पासून चतुर्थश्रेणी शिपाई सेवा केली. तेव्हा राजकुमार यांचे वय ४४ होते आता पदावर नियुक्त होऊ शकत होते ,पण त्यांच्या जागी रोजगार सेवकाला नियुक्त करण्यात आले.नियुक्ती करण्याबाबत ची माहिती गावकऱ्यांना द्यावी लागते चपराशी पदाबाबत जाहिरात प्रसिद्ध करावी लागते .
आता जे पदावर नियुक्त आहेत त्यांचे वडील आधी ग्रामपंचायतमध्ये लिपिक पदावर कार्य करायचे, त्यांची सेवा संपल्यानंतर मुलाला रोजगार सेवक म्हणून पद दिले जर नियमानुसार नियुक्त केली नाही तर, मी माझ्या कुटुंबासह आमरण उपोषण करणार असे भगत याने निवेदनातून सांगितले.