वर्धा:- १६ ऑक्टोंबर रोजी हिरापूर गावामध्ये परसराम कन्नाके हा वडिलांच्या घरी खरेदी केलेल्या गव्हाचे पैसे स्वतः आणून देईल असे सांगण्यासाठी गेला. लहान भाऊ भास्कर कन्नाके यांनी ‘तू बाबाचे पैसे का देत नाही’
असे म्हणून शिवीगाळ केली व मारहाण सुद्धा केली. परसराम च्या पत्नीने त्याला हटकले असता तुझ्या पतीला जीवाने मारेल व तुलाही मारेल अशी धमकी भास्कर याने दिली या प्रकरणी सावंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.