चांदुर बाजार: दरवर्षी नैसर्गिक कारणाने आपत्ती येत असते यामुळे शेतमालाला कमी भाव मिळते. शेतीतील उत्पादन घटते, नेहमी अतिवृष्टी, पाऊस आर्थिक अडचण ,कर्जफळीची चिंता या कारणामुळे आलेले नैराश्य साडेतीन महिन्यात ऐन खरीप हंगामात ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. जून महिन्यात १८ जुलैमध्ये १९ आणि ऑगस्ट महिन्यामध्ये १८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
यावर्षीच्या म्हणजे २०२४ चा अर्धा खरीप हंगाम संपला आहे. यात मूंग, उडीद, सोयाबीन ही पिके पूर्णतः हातातून गेली. आता कपास व तूर हे पिके बाकी आहे. हे दोन्ही पिके ६० टक्के गेल्यातच आहेत तेच हाल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आहेत. याच आठ महिन्यात जिल्ह्यांत जानेवारी ते ऑगस्ट मध्ये १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सप्टेंबर मध्ये शेतकरी आत्महत्यांचा समावेश नाही.
जानेवारी-२२
फेब्रुवारी-२६
मार्च-३४
एप्रिल-२२
मे-२०
जून-१८
जुलै-१९
ऑगस्ट-१८
जिल्ह्यामध्ये १८० आत्महत्यापैकी ६५आत्महत्या मदतीस पात्र
. गेल्या आठ महिन्यात १८० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी 65 आत्महत्यांना शासनाच्या मदतीस पात्र ठरविण्यात आले.
. त्या पात्र आत्महत्याग्रस्तापैकी ४९ कुटुंबांना मदत देण्यात आली. ८२ प्रकरणे लांबवली आहेत, तर ३३ प्रकरणे अपात्र ठरवले.