वाशिम :- ११ नोव्हेंबरला रात्रीच्या दहाच्या सुमारास पेट्रोलिंग करताना एक व्यक्ती संशयास्पद स्थितीमध्ये आढळला, पोलिसांनी या व्यक्तीला अडवून तपासले असता त्याच्याजवळ २५ लाख रुपयाची रोख रक्कम दिसली. पोलिसांनी ही रक्कम जप्त करून वाशिम शहराचे पोलीस ठाणेदार यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे अहवाल सादर करून कायदेशीर कारवाई करण्याचे मार्गदर्शन मागितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळेस पोलीस पथक गस्त घालत असताना त्यांना एक मोरपंखी रंगाची संशयास्पद दुचाकी आढळली, पोलिसांनी ही दुचाकी तपासत असता कापडी पिशवीमध्ये व्यक्ती काहीतरी संशयास्पद वस्तू नेतांना दिसला म्हणून पिशवी तपासली असता त्या पिशवीमध्ये २५ लाख रोख रक्कम आढळून आली.
आरोपीचे नाव यश राठी याला ही रक्कम कुठून आणली असे विचारले असता वाशिम मधील ॲक्सिस बँकेतून विड्रॉल केल्याचे सांगितले.पोलिसांनी अनिलला दुचाकिसह पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध नोंद केली आता आचारसंहिता सुरू असल्याने कोणत्याही व्यक्तीला ५० हजार रुपयांच्या वर रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही, म्हणून पोलिसांनी ही रक्कम जप्त केली व आरोपीवर कार्यवाही करून ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्याची मागणी करीत आहे.