वाशिम :- २३ ऑक्टोंबर ला वाशिम मधील मालेगाव पंचायत समिती मधील कनिष्ठ सहाय्यक गजानन इंगोले (५२) हा लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला.मिळालेल्या माहितीनुसार, शासनाकडून शेतकऱ्यांना सिंचन विहिरीसाठी अनुदान दिले जाते तसेच एका २२ वर्षीय मुलाच्या वडिलांच्या नावावर विहीर मंजूर झालेली आहे. तो मुलगा पंचायत समितीत गेला व विहिरीची खर्चाची फाईल ऑनलाईन करून मागू लागला, त्यासाठी मालेगाव पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक रतन इंगोले यांनी ५,५०० ची मागणी केली.
मात्र या युवकाला पैसे द्यायचे नसल्याने त्याने वाशिम येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली, या तक्रारीची दखल घेत विभागाने २१ ऑक्टोबरला तपास सुरू केली. त्यांनी २३ ऑक्टोबरला एक प्लॅन केला तक्रारदार २२ वर्षीय तरुण याने रतन इंगोले ला लाच देण्यास तयार झाला.
जसे तक्रारदाराने आरोपीला लाच दिली तसेच लाचलुचपत विभागाने इंगोले याला ताब्यात घेतले. व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला ही कारवाई लाचलुचपत विभाग व पोलीस यांच्या चमूने केली.या केलेल्या कार्यवाही मुळे अनेक लाचलुचपत करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. शासकीय काम करण्यासाठी कोणत्याही कर्मचाऱ्यांनी किंवा अधिकाऱ्याने लाचेची मागणी केल्यास याबद्दलची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदवावी.