वाशिम :- २६ ऑक्टोंबरला कामरगाव येथे हजरत गोधळशहावली बाबा संस्थांच्या वतीने उर्स निमित्ताने मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीमध्ये क्षमतेपेक्षा ज्या डीजे वाहनांमधून आवाज येत होता अशा ७ डीजे वर वाहनावर २७ ऑक्टोबरला शनिवारी ताब्यात घेऊन जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कामरगाव गावामध्ये हजरत गोधळशहावली बाबाच्या संदल निमित्त काढलेल्या मिरवणुकीत अनेक ठिकाणचे डीजे आले होते, पुणे वैजापूर अहमदनगर वाशिम इत्यादी ठिकाणचे डीजे होते. यांच्यावर धनज पोलिसांनी रात्री कार्यवाही करून वाहनांना ताब्यात घेतले, यातील ७ वाहनावर परिवहन अधिकाऱ्यांनी रविवारला २७ ऑक्टोबर रोजी १ लाख २७ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली.
यापूर्वी कामरगाव येथे दुर्गादेवी विसर्जनच्या वेळेस कामरगाव येथे एका डीजेवर १७०० रुपये दंड आकारण्यात आला होता.ही कारवाई ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनात झाली असून यापुढे कोणत्याही कार्यक्रमात प्रतिबंध असलेला डीजे चा वापर करू नये असे आवाहन केले आहे.