वाशिम :- ५ नोव्हेंबरला कारंजा तालुक्यातील जांब येथे तलावात पोहण्यासाठी गेलेला युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाला, मृत युवकाचे नाव आकाश सुदाम जाधव हा कामठवाडा येथे राहायचा. मिळालेल्या माहितीनुसार, तीन युवक जांब गावातील पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी गेले. त्यांनी तलावाच्या तीरावर आधी कोण पोहोचणार याची शर्यत लावली व तिघे धावायला लागले,
त्यातील दोन युवकांनी अर्ध्यातून माघार घेतली तर आकाश जाधव यांनी न थांबता तीरावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याचा धावता – धावता तोल गेल्यामुळे आकाश तलावात बुडाला त्याच्या मित्रांचे लक्ष होते मात्र आकाश बुडाल्यामुळे त्याला वाचवू शकले नाही. ५ नोव्हेंबरच्या रात्री त्याची शोधा शोध केली पण त्या रात्री मृतदेह सापडला नाही.
दुसऱ्या दिवशी ६ नोव्हेंबरला सकाळचे ७ च्या दरम्यान तलावात मृतदेह तरंगताना दिसला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला नंतर कुटुंबियांना मृतदेह सोपविण्यात आला. त्यानंतर बुधवारी कामठवाडा या ठिकाणी आकाश जाधव यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले, दरम्यान कारंजा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…
गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…
गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…
यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…
वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…
अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…
This website uses cookies.