वाशिम :- ३० ऑक्टोंबरला रात्री ७ च्या सुमारास शाहिल कॉलनीमध्ये लहान भावाने मोठ्या भावावर चाकू हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, या घटनेनंतर जखमीचा अमरावती रुग्णालयात उपचार सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीदार मोहम्मद फारुख अब्दुल गफ्फार हा व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर आहे .
ते दोन मुलासह शाहील कॉलनीत राहतात, मोहम्मद फारुख यांचा लहान मुलगा ३० वर्षीय असून त्याचे नाव फरीद मोहम्मद फारूक पारेख आहे. हा नेहमी संपत्तीसाठी मोठ्या भावाबरोबर वाद घालायचा वडिलांना संपत्तीच्या हिस्सा करून मागायचा या कारणावरून त्याचा मोठा भाऊ फिरोज पारेख व फरीद पारेख यांच्यामध्ये कळाक्याचे भांडण झाले होते.३० ऑक्टोबरला सुद्धा दोन्ही भावांमध्ये वाद झाला,
लहान भावाने रागाच्या भरात मोठ्या भावाच्या पोटात चाकू खुपसला व त्याला जीवाने मारण्याचा प्रयत्न केला ही घटना होताना तक्रारदाराच्या गाडी चालकाला दिसली त्याने व त्याच्या पत्नीने आरोपीच्या हातातून चाकू हिसकला व फिरोज खान ला वाचवले, आरोपीने बाहेरून दरवाजा बंद करून पळाला. जखमी फिरोजला नागरिकांनी अमरावती रुग्णालयामध्ये दाखल केले व या घटनेची तक्रार मोहम्मद फारूख पारेख यांनी कारंजा पोलीस ठाण्यात केली, व आरोपीविरुद्ध विविध कलमाद्वारे गुन्हा नोंदविला.