वाशिम :- वाशिम मध्ये मंगरूळपीर शहरासह ग्रामीण भागात विजेचे ये-जा सुरू आहे. वीज गेल्यानंतर ती किती वाजता येईल याची शाश्वती नाही, तासंतास वीज येत नाही यामुळे याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. तसेच विजेमध्ये सातत्य नसल्याने विविध व्यवसायावर प्रभाव पडत आहे, या कारणाने नागरिक त्रस्त होऊन महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील शेतकरयांना रब्बी हंगामाच्या पिकाकरिता पाणी देण्यासाठी विजेची आवश्यकता असते गहू चना व भाजीपाला इत्यादी पिकांना पाणी देणे गरजेचे असते पाणी देतानांच विज खंडित होऊन पंप बंद पडतो म्हणून शेतकरी सुद्धा वैतागले आहे.काही गावांमध्ये वीज वाहिन्या जुन्या आहेत त्या कधीही तुटतात म्हणून विज जाते,
नागरिकांनी व शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला परंतु त्यांच्याकडून तातडीची प्रतिक्रिया दिसत नाही, शहरांना त्रास होतो त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये या लोकांना विजेच्या जास्त त्रास सहन करावा लागत आहे, म्हणून नागरिकांनी महावितरण विभागाने विजेकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी केली आहे.