वाशिम :- २४ ऑक्टोबरच्या रात्री शहापूर येथे मालमत्ता वाटणीच्या वादावरून पती व त्याच्या पहिल्या पत्नीच्या मुलाने धारदार शस्त्राने वार करून महिलेची हत्या केली. ही घटना मंगळुरपीर पोलीस स्टेशनमध्ये २५ ऑक्टोबरला फिर्यादीने दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी किशोर ठाकूर (३०) याने पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार २००२ मध्ये माझ्या वडिलांचे निधन झाले ते कृषी विभागात नोकरीवर होते.
माझी आई संगीता कामानिमित्त कृषी विभागात जायची यादरम्यान तिची ओळख लक्ष्मण पवार नावाच्या व्यक्तीशी झाली , लक्ष्मण पवार यांचे त्याच्या पत्नी सोबत पटत नसल्याने आईने व लक्ष्मण पवार यांनी लग्न केले. सावत्र वडील लक्ष्मण पवार यांना चार अपत्ये होती. सावत्र वडिलांचा मोठा मुलगा अनिल याचे निधन झाल्यानंतर त्याची मुलगी वंशिका ही आमच्या सोबत राहायची, आणि लक्ष्मण पवार यांचा लहान मुलगा शैलेश हा नोकरी निमित्त अमरावती मध्ये राहायचा.
मी, सावत्र वडील, आई व सावत्र भावाची मुलगी वंशिका ही मंगरूळपीर येथे राहत होतो. २ वर्षानंतर मला पोस्टात नोकरी मिळाल्याने मी मुंबईला राहायला गेलो सावत्र वडिलांचा लहान मुलगा शैलेश हा नेहमी मालमत्ता वाटण्यासाठी वाद घालत असायचा.सावत्र वडील व भाऊ शैलेशने याने मोका मिळताच २५ ऑक्टोबरला सकाळच्या वेळेस दोघांनी आईवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली, असे तक्रारी मध्ये सांगितले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठुन आरोपींना अटक केली.