वाशिम:- ज्या लाभार्थ्याकडे शिधापत्रिका आहे त्या प्रत्येक लाभार्थ्यांनाही केवायसी करणे बंधनकारक आहे, या आधी शासनाने ई – केवायसी साठी ३१ ऑक्टोबर ही मुदत ठेवली होती. आता ही तारीख वाढवून ३१ डिसेंबर केली आहे तरी राहिलेल्या ई- केवायसी धारकाकडून कोणत्याही प्रकारच्या प्रतिसाद दिसत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार,रेशन कार्ड धारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनाज पुरविला जाते, यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनाही केवायसी करणे महत्त्वाचे आहे ही प्रक्रिया मागच्या दोन वर्षापासून सुरू आहे यातील ६० टक्के लाभार्थ्यांनी ई -केवायसी केली तर ४० टक्के लाभार्थी बाकी आहेत.
३१ डिसेंबर पर्यंत लाभार्थ्यांनी ई -केवायसी करणे गरजेचे आहे, या मागचा उद्देश पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचा आहे. जर या अवधीमध्ये ई -केवायसी केली नाही तर त्यांना धान्य पुरवठा बंद होईल तर काही लाभार्थ्याचे आरोप आहे की रेशन दुकानदाराकडून ठराविक वेळेतच ई- केवायसी सुविधा उपलब्ध असल्यामुळे केवायसी च्या टक्का वाढत नाही.
रेशनच्या दुकानात ई – केवायसी ही पास मशीनद्वारे होते त्यावर लाभार्थ्याचे हाताचे ठसे व आधार नंबर टाकून डोळे स्कॅन करतात, एवढे करून ही केवायसी प्रक्रिया पूर्ण होते त्यामुळे ज्या शिधापत्रिका धारकाची ई-केवायसी बाकी आहे त्यांनी लवकर केवायसी करावी अन्यथा अनाज मिळणार नाही.
अमरावती:- तरुणाने मुलीशी लग्न जोडुन कुटुंबियांना सांगितले की मला मुलीशी एकट्यात बोलायचे आहे, व तो…
अमरावती :- २५ वर्षीय तरुणीवर वारंवार दोन व्यक्तींनी अत्याचार केला, आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची…
बुलढाणा:- मारहाण करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस ४ वर्षाचा कारावास व ११ हजार रुपये…
अकोला:- कचरा व्यवस्थापनासाठी घराघरांवर शहरात क्युआर कोड लावले या कोडचा वापर शहरातील घरामधील कचरा नियमित…
अमरावती:- रेशनच्या ई - केवायसीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे, सार्वजनिक प्रणाली अंतर्गत रेशनकार्ड…
यवतमाळ :- मानसिक विकलांग बालकावर अत्याचार करणाऱ्या आरोपींना ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे,…
This website uses cookies.