Wardha

विदर्भात फक्त याच ठिकाणी संभाव्य प्लास्टिक सर्जरीने केली अपंगत्वार मात..

वर्धा: सावंगी येथे मेघे अभिमत विद्यापीठाच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांनी अनेक विविध शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. पण या प्रकरणांमध्ये अलौकिक यश प्राप्त केले धारदार काचेमुळे हाताच्या पूर्ण नसा कापल्याने तरुणाचा हात कापल्याशिवाय काही उपाय नसतांना केवळ मायक्रोव्हस्क्युलर प्लास्टिक सर्जरीद्वारे रुग्णाला अपंगत्वापासून वाचवणारी शस्त्रक्रिया ही सावंगी मेघे या ठिकाणी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात झाली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवडा या ठिकाणीचे रहिवासी शांती चोटपेल्लीवार (३५) हा व्यक्ती दुकानात साफसफाई करत असताना अचानक काच फुटून त्या काचेच्या मोठा तुकडा त्याच्या उजव्या हातामध्ये गेला. आणि त्या धारदार काचेमुळे शांतीच्या हाताच्या रक्तवाहिन्या कापल्या गेल्या त्यातून जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे तो बेशुद्ध झाला. व या आकस्मिक प्रकरणामुळे घरातील सर्व सदस्य घाबरले.

पांढरकवडा या ठिकाणचे नगराध्यक्ष नहाने व सामाजिक कार्यकर्ते सोनू उप्पलवार यांनी चोटपेल्लीवार कुटुंबीयांची भेट घेऊन जलद गतीने सावंगी मेघे हॉस्पिटल मध्ये भरती होण्यास सांगितले. आणि चोटपेल्लीवार परिवाराने वेळ न गमवता शांतीला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयामध्ये प्लास्टिक सर्जन डॉक्टर फिरोज बोरले यांनी रुग्णालयात तपासणी केली असता, उजव्या हाताच्या पुढील भागाला गंभीर इजा होऊन हाताची स्नायू , रक्तवाहिन्या, मज्जातंतू व अन्य नसा पूर्ण कापल्या गेल्याचे दिसून आले. स्नायू व वाहिन्यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती न केल्यास शरीरापासून हात वेगळे करणे जरुरी झाले होते. अशा गंभीर अवस्थेमध्ये डॉक्टर फिरोज यांनी जलद गतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. बधिरीकरण तज्ञ डॉ.अमोल सिंघम व डॉक्टर आदिती गहुकार या सर्वांच्या मदतीने डॉक्टर बोरले यांनी मायक्रोव्हस्क्यूलर प्लास्टिक सर्जरी करून हाताची पुनर्रचना यशस्वीरित्या पार पाडली. रुग्णाला जलद गतीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे ही शस्त्रक्रिया चांगल्या रित्या पार पडली नाही, तर रुग्णाचा हात कापण्या शिवाय पर्याय नव्हते असे डॉ. फिरोज बोरले यांनी सांगितले.

विदर्भामध्ये फक्त सावंगी रुग्णालयामध्ये ही सुविधा उपलब्ध

अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया राज्यात मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरामध्ये उपलब्ध असून जास्त खर्चाच्या आहेत. विदर्भामध्ये कोणते हॉस्पिटल मध्ये ही सेवा उपलब्ध नाही, फक्त मायक्रोवेस्क्युलर प्लास्टिक सर्जरीचे शिक्षण घेतलेले तज्ञच ही शस्त्रक्रिया करू शकतात. आज सावंगी मेघे हॉस्पिटल मध्ये ही सेवा कमी खर्चात व सहज उपलब्ध असल्यामुळे जास्त खर्च रुग्णाच्या परिवाराला लागला नाही आणि कमी वेळेमध्ये रुग्ण सुखरूप पणे आपल्या घरी पोहोचला, असे डॉ. बोरले यांनी सांगितले.

Vidarbha Trends Team

Recent Posts

विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के व…

11 hours ago

ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही…

11 hours ago

लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ…

11 hours ago

यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत ८५…

14 hours ago

शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ

वर्धा :- शिक्षकाने आईला म्हटले तुमची मुलगी अभ्यासात कच्ची आहे मी तिला दुसऱ्या बॅचमध्ये नेऊन…

16 hours ago

हरभऱ्याच्या पिकात जंगली रानडुकरामुळे शेतात रात्रभर जागरण

अकोला:- शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम लागल्यामुळे शेतात हरभरा, गहू, मका, बाजरी अशा अनेक पिकाची पेरणी केली…

17 hours ago

This website uses cookies.