Send News on +91 - 92090 51524
More
    HomeGadchiroliविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूसह दोन आरोपींना केली अटक

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूसह दोन आरोपींना केली अटक

    Published on

    spot_img

    गडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरपोलिस भागांत कारवाई करत दोन दुचाकींसह १ लाख ५ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केल्याची घटना घडली आहे .त्यासोबतच पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली आहे. मागील २४ तासात शहर ठाण्याच्या हद्दीतील विविध दरम्यान, याप्रकरणी ४ दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरातील कारगिल चौकातील रहिवासी राजू पोटवार हा दुचाकीवरून दारूची तस्करी करत असल्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने कारवाई करत त्याच्याकडून ३ हजार ५०० हजार रुपये किमतीची दारू व ३५ हजार रुपये किमतीची एमएच ३३ एच ५३१५ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच येवली गावातील नेताजी बोदलकर दुचाकीवरून दारूची तस्करी करताना आढळून आले. त्याच्याकडून ३ हजार २२० रुपये किमतीची दारू आणि एमएच ३३ एएफ-१७०८ क्रमांकाची ४७ हजार रुपये किमतीची दुचाकी असा एकूण हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय शहरातील सुभाष वॉर्डातील फैजान शेख याच्या घरावर छापा टाकून ७ हजार ३५० रुपयांची दारू तसेच आठवडी बाजारातील रहिवासी लता चापले हिच्या घरावर छापा टाकून ९ हजार १२० रुपयांची दारू जप्त करण्यात आली.

    विधानसभा निवडणुकीसाठी पोलिसांनी केली कारवाई:

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूसह दोन आरोपींना केली अटक

    आरमोरी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चुरमुरा जवळच्या वैनगगा शहर धड़क नदीघाटाकडून दुचाकीने दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे . त्यांच्या ताब्यातून प्लॉस्टिक चुंगळीत ९० एमएल देशी दारूच्या ३५० नग बाटल्या, प्रतिनग ३५ रुपये याप्रमाणे १२ हजार २५० रुपये किमतीची दारू जप्त केली. सोबत ६० हजार रुपये किमतीची दारू पकडली आहे. यात एकूण ७२ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे.

    पोलिस निरीक्षक कैलास गवते यांच्या मार्गदर्शनात चुरमुरा शेतशिवारात मार्गावर सापळा रचून शिवलिंगम ऊर्फ शिवा शंकर ताडपल्लीवार (२३) व मुन्ना राजेंद्र भोयर (३१) रा. मोहझरी, ता. जि. गडचिरोली ह्या दोन आरोपींना दारू व एमएच ३३ एफ ४८६३ क्रमांकाच्या मोपेड दुचाकीसह अटक करण्यात आली आहे .

    Latest articles

    विधानसभा निवडणुकीसाठी ८५ वर्षीयपूर्ण केलेल्या, दिव्यांगत्व असलेल्या मतदारांसाठी सोय

    चंद्रपूर : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षीय पूर्ण केलेल्या, तसेच ४० टक्के...

    ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पोलिस ठेवत आहेत नागरिकांवर लक्ष

    गोंदिया : या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक कालावधी पूर्ण होईपर्यंत...

    लाच मागणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपिकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

    गडचिरोली : या जिल्ह्यात सेप्टिक टाक्यांची सफाई केल्याचे बिल काढून दिल्याबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयातील...

    यवतमाळमध्ये सकाळी ७ वाजता पासून तीन दिवस मतदान प्रक्रिया

    यवतमाळ :- यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजता पासून १४ ते १६ नोव्हेंबर पर्यंत...

    Read More Articles