अमरावती :- २० नोव्हेंबरला दोनच्या सुमारास ७५ वर्षीय वृद्धाचा मतदान करून घरी परतताना अपघातात मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव वासुदेवराव राऊत हे ७५ वर्षीय असून मोर्शी येथील मुळचे रहिवासी आहे. ते दापोरी येथे जावयाकडे राहत होते.
त्यांचे मोर्शी मध्ये मतदार यादी मध्ये नाव असल्याने ते मोर्शी मध्ये आले व शिवाजी कन्या शाळेच्या केंद्रावर मतदान करून दापोरी कडे जाण्यासाठी हिवरखेड येथील धनंजय गुडरांधे यांच्या ऑटो मध्ये बसले. बसल्यानंतर काही किलोमीटर अंतरावर ऑटोरिक्षा उलटला.त्यात सर्व प्रवासी खाली पडले.
वासुदेवराव राऊत यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांच्या जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित प्रवाशांना किरकोळ मार बसला आहे. पोलिसांनी त्वरित पोलीस स्टेशन गाठून पंचनामा केला व मृतदेह रुग्णालयात तपासणी साठी पाठवल्यानंतर पोलिसांनी ऑटोचालकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविण्यात आला.
वृद्धाचा रस्त्यात अपघात
७५ वर्षीय वासुदेवराव राऊत मोर्शी मध्ये मतदान केल्यानंतर दापोली मध्ये जावयाकडे जाण्यास ऑटो ने निघाले, अचानक रस्त्यात ऑटो उलटला व वृद्धाचा जागीच अपघात होऊन मृत्यू झाला.