गोवरी: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात दगडी कोळशाचा मुबलक प्रमाणात साठा आहे.वेकोलित धूळ प्रदूषण रोखण्यासाठी अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे.
वेकोलित नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात धूळ प्रदूषण करण्यात येत आहे . मात्र , याकडे वेकोल प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे वेकोलिने गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, परिसरात खुल्या कोळसा खाणींचे निर्माण केले. वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीत दिवसरात्र कोळशाचे उत्पादन घेतले जाते. मात्र याठिकाणी धूळ मोठ्या प्रमाणात उडत असल्याने येथे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोबतच वेकोलि परिसरात असलेल्या शेतीवर धुळीचा विपरीत परिणाम होत असल्याने शेती पूर्णतः धुळीने खराब झाली आहे.
वेकोलिच्या खुल्या कोळसा खाणीतून सिमेंट कंपन्यांसह इतर ठिकाणी कोळशाची वाहतूक केली जाते. वेकोलितून दिवसरात्र कोळशाची वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची परीस्थिती खराब होत आहे .
वेकोलित धुळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही :
वेकोलित धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. केवळ वरवर पाणी मारून धूळ नियंत्रणाचा देखावा केला जात आहे . मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कोळसा खाणीत धूळ प्रदूषण वाढले आहे. कोळसा इतरत्र वाहतूक करताना वाहनांवर ताडपत्री झाकणे आवश्यक असते. मात्र रस्त्यावर बारीक कोळसा पडून प्रदूषण तर होतेच; शिवाय कोळशाचे ढेले पडून मोठी दुर्घटना झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.
मात्र संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. वर्षाकाठी करोडो रुपयांचा नफा कमावणाऱ्या करोडो रुपयांचा नफा कमावणाऱ्या धूळ प्रदूषण होणार नाही याची काळजी
घेणे आवश्यक आहे .